नंदुरबार, 18 सप्टेंबर, (हिं.स.) शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात येत असून, ही बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 29 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव कल्पना ठुबे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर