नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.) : केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर त्यासाठी कौशल्ये यावी लागतात भविष्यात व्यवस्थापनाच्या भूमिकेत एआय हा दुवा असणार आहे. याकरिता एआय या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतल्यास यश निश्चित मिळेल तसेच फक्त कर्मचारीच न राहता उद्योजक बनण्याची जिद्द ठेवा असे मार्गदर्शन संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांनी के.आर.सपकाळ कॉलेज ऑफ मेनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयातर्फे २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले. महाराष्ट्र ओद्योगिक विकास केंद्राचे प्रादेशिक अधिकारी आलोक मिश्रा यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती आपल्या मनोगतामध्ये नाशिक मध्ये 2027 मध्ये होणार्या कुंभमेळा आयोजन हे व्यवस्थापन तसेच उद्योजकतेच्या असंख्य संधि निर्माण करणार असून त्यामधील विविध योजनांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करताना व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. आरती मोरे यांनी केले . मागील वर्षी प्रथम वर्ष एमबीए मधून विशेष प्राविण्य मिळविलेल्या साक्षी मेधने, जान्हवी चव्हाण, गायत्री भागवत, अभिषेक कोली या विद्यार्थ्याचा सपकाळ नॉलेज ह्बचे अध्यक्ष व संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा सौ कल्याणी सपकाळ, प्रशासन अधिकारी डॉ. सचिन हारक, अभियांत्रिकचे प्राचार्य डॉ. साहेबराव बागल, औषधनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.बच्छाव, प्राचार्या प्रा. दीप्ती फडतरे, प्रा. अजित वाघ, सर्व विभागप्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV