अबुधाबी, 18 सप्टेंबर (हिं.स.) आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन ने केल्याचा वाद आता वाढतच चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये संघाचा कर्णधार सलमान अली आगा, मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि पीसीबीचा एक अधिकारी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
आशिया कप २०२५ च्या १० व्या सामन्यात पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करून सुपर फोरमध्ये आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पीसीबीने एका म्यूट व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यामध्ये सामनाधिकारी पायक्रॉफ्ट माफी मागत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण या व्हिडिओमध्ये कोणताही ऑडिओ नाही. बोर्डाने पुढे म्हटले आहे की, पीसीबीने अँडी पायक्रॉफ्ट यांच्या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पायक्रॉफ्टने १४ सप्टेंबरच्या घटनेला गैरसमज म्हणून वर्णन केले आणि माफी मागितली. आयसीसीने सांगितले की, ते सामन्यादरम्यान झालेल्या आचारसंहितेचे उल्लंघनाची चौकशी करणार आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा आणि संघ व्यवस्थापक नवीद अक्रम यांच्याशी भेटीचा प्रस्ताव मांडला.अहवालात म्हटले आहे की, प्रशिक्षक माइक हेसन देखील बैठकीत उपस्थित होते. ही बैठक दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील पायक्रॉफ्टच्या खोलीत झाली. ज्याठिकाणी पंचांनी पाकिस्तानशी संभाव्य गैरसमजांबद्दल चर्चा केल्याची माहिती आहे.
१४ सप्टेंबर २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या आशिया कप ग्रुप अ सामन्याशी संबंधित आहे. पहलगाम घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव सुरूच आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर आले. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. दरम्यान, नाणेफीच्यावेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन केले नाही .सामना जिंकल्यानंतरही भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन केले नाही. त्याला प्रतिसाद म्हणून पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा सामन्यानंतरच्या सादरीकरणात सहभागी झाला नाही.
हे प्रकरण आणखी वाढले आणि पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने अधिकृत तक्रार दाखल केली.ज्यात म्हटले होते की हस्तांदोलन न करणे हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. त्यांनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टला त्यांच्या संघाच्या सामन्यांमधून काढून टाकले नाही. तर स्पर्धेतून माघार घेण्याची धमकीही दिली. परिणामी पीकिस्तान विरुद्ध यूएई सामना एक तास उशिरा सुरू झाला कारण पाकिस्तानी क्रिेकेटपटू मैदानावर येण्यास तयार नव्हते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे