भारतीय हॉकीचा शताब्दी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर, (हिं.स.). भारतीय हॉकीच्या ऐतिहासिक १०० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी देशभरात तयारी सुरू झाली आहे. हॉकी इंडियाने आता यासाठी केवळ ५० दिवस शिल्लक असताना जोरदार कार्यक्रमाची तयारी सुरु केली आहे. याचा शे
भारतीय हॉकीच्या शताब्दी उत्सवाची देशभरात तयारी सुरु


नवी दिल्ली, १८ सप्टेंबर, (हिं.स.). भारतीय हॉकीच्या ऐतिहासिक १०० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी देशभरात तयारी सुरू झाली आहे. हॉकी इंडियाने आता यासाठी केवळ ५० दिवस शिल्लक असताना जोरदार कार्यक्रमाची तयारी सुरु केली आहे. याचा शेवट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी एका विशेष मारंभाने होणार आहे. हा उत्सव १९२५ मध्ये पहिल्या राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या प्रवासाचे प्रतिक असेल आणि भारताला आतापर्यंतच्या सर्वाधिक आठ ऑलिंपिक सुवर्णपदकांच्या संख्येपर्यंत नेले जाईल.

हॉकी इंडियाने सांगितले की, या उत्सवाचा सविस्तर कार्यक्रम लवकरच सामायिक केला जाणार आहे. १९२८ ते १९८० पर्यंत भारताने आठ ऑलिंपिक सुवर्णपदके जिंकली, जी आतापर्यंत कोणत्याही देशाने जिंकलेली सर्वाधिक आहे. शिवाय ऑलिंपिक इतिहासात एकाच खेळात सर्वाधिक पदकांचा विक्रमही भारताच्या नावावर आहे.

१९६४ च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे दिग्गज हॉकीपटू गुरबक्ष सिंग म्हणाले, भारतातील पहिली हॉकी स्पर्धा, बेइटन कप, १८९५ मध्ये खेळली गेली. राष्ट्रीय हॉकी असोसिएशनची स्थापना १९२५ मध्ये झाली आणि त्यानंतर फक्त तीन वर्षांनी, १९२८ मध्ये, आम्ही ऑलिंपिक सुवर्ण जिंकले. ध्यानचंद यांच्या काळात भारताने जगावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यांनी आठवण करून दिली की, १९४८ पर्यंत ब्रिटनने हॉकी संघ खेळवला नव्हता कारण त्यांना भारताकडून पराभवाची भीती होती. स्वातंत्र्यानंतर लंडनमध्ये ब्रिटनचा पराभव हा भारताच्या इतिहासातील सर्वात गौरवशाली क्षणांपैकी एक होता.

गुरबक्ष सिंग यांनी बर्लिन ऑलिंपिकच्या आठवणीही सांगितल्या. त्यांनी सांगितले केले की, त्यावेळी निधीची कमतरता होती आणि राजघराण्यांसह सुमारे ३५ जणांनी जर्मनीला जाण्यासाठी १०० ते ५०० रुपयांचे योगदान दिले. अशा प्रकारे, ५०,००० रुपये जमा झाले आणि संघ जहाजाने जर्मनीला पाठवण्यात आला.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष आणि माजी दिग्गज डॉ. दिलीप तिर्की म्हणाले, नवीन पिढीला हॉकीच्या या सुवर्ण इतिहासाची जाणीव झाली पाहिजे. शताब्दी समारंभाच्या माध्यमातून त्या गौरवशाली दिवसांना पुन्हा जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजपासून सुरू होणारी ५० दिवसांचे उलटी गिनती हे त्या दिशेने एक पाऊल आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande