म्युनिक, १८ सप्टेंबर, (हिं.स.) - जर्मन चॅम्पियन बायर्न म्युनिकने चेल्सीचा ३-१ असा पराभव केला. पहिला गोल चेल्सीचा बचावपटू ट्रेव्होह चालोबाहने आत्मघातकी गोल करून बायर्नला २० व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर केनने २७ व्या मिनिटाला पेनल्टी मिळवून आघाडी वाढवली. पण केवळ दोन मिनिटांनी कोल पामरने चेल्सीला पुनरागमनाच्या आशा पल्लवीत केल्या. पण केनने ६३ व्या मिनिटाला आणखी एक गोल करून बायर्नला सामना जिंकून दिला.
बायर्नचा हा सलग २२ वा चॅम्पियन्स लीग सलामीचा सामना होता. दरम्यान, प्रीमियर लीगमध्ये अपराजित राहिलेल्या चेल्सीला या हंगामात पहिला पराभव पत्करावा लागला.
आणखी एका साइमान्यत इंटर मिलानने अजाक्सवर २-० असा विजय मिळवून दमदार सुरुवात केली. फ्रेंच स्टार मार्कस थुरमने दोन्ही गोल केले. त्याने हाफटाइमच्या तीन मिनिटे आधी हाकान कॅलहानोग्लूच्या कॉर्नरवरून एक उत्कृष्ट हेडर मारला. त्यानंतर दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला त्याने आणखी एक हेडर मारून आघाडी वाढवली.
गेल्या हंगामाच्या अंतिम फेरीत पीएसजीकडून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या इंटर मिलानने या विजयासह पुनरागमन केले आणि आत्मविश्वासाने स्पर्धेत प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे