चाकूर तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। आज चाकूर तालुक्यातील विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षावर दृढ विश्वास व्यक्त केला. यावेळी सर्वांचा सन्मान
अ


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

आज चाकूर तालुक्यातील विविध पक्षातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षावर दृढ विश्वास व्यक्त केला. यावेळी सर्वांचा सन्मान करून पक्षात स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशामध्ये वडवळ नागनाथ सरपंच मुरली सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, चेअरमन उमाकांत आचवले, ग्रामपंचायत सदस्य महादेव सूर्यवंशी, रामलिंग बनसकर, बाबू भोजने, मा.व्हाईस चेअरमन हनमंत लवटे, आजमत पटेल, सिकंदर पटेल, सलीम उत्साद, नजीर मुंजेवार, शिवराज आचवले आदींचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव लोकांच्या हितासाठी व विकासाच्या कार्यासाठी कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे पक्षाची ताकद वाढून जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल. या प्रवेशामुळे चाकूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाली असून, आगामी काळात ग्रामपातळीपासून तालुक्यापर्यंत विकासाच्या वाटचालीला नवे बळ मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande