अमरावतीत बनावट जन्मदाखले; ४१ आरोपींवर 9300 पानांचे दोषारोपपत्र दाखल
एसआयटी स्थापन झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला आली गती अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्यात सुमारे सात महिन्यांपूर्वी बनावट जन्मदाखल्यांच्या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र सात महिन्यानंतरही तपासात प्रग
अमरावतीत बनावट जन्मदाखले; ४१ आरोपींवर 9300 पानांचे दोषारोपपत्र दाखल


एसआयटी स्थापन झाल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला आली गती

अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्यात सुमारे सात महिन्यांपूर्वी बनावट जन्मदाखल्यांच्या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र सात महिन्यानंतरही तपासात प्रगती नसल्यामुळे पोलिस आयुक्त अरविंद चाक्रीया यांनी आठ दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे एसीपी शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात एसआटी स्थापन केली होती. त्यानंतर एसआयटीने मागील आठ दिवसांत या प्रकरणाच्या तपासाला गती देवून तो पूर्ण केला. इतकेच नाहीतर ४१ आरोपीविरुद्ध तब्बल १३०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तहसीलमधून जन्म दाखले मिळवण्यासाठी शाळा सोडल्याच्या दाखल्यांमध्ये खोडतोड, अन्य बनावट कागदपत्रे जोडून जन्म दाखले मिळवल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात १८ फेब्रुवारीला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान या प्रकरणाच्या सखोल व वेगवान तपासासाठी शहर आयुक्तालयस्तरावर एसआयटी स्थापन केली होती. एसीपी शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वातील एसआयटीने गाडगेनगर पोलिस ठाण्यात नोंद गुन्ह्यासह एकुण ५४ संशयित प्रकरणांची चौकशी केली होती. त्यासाठी युद्धपातळीवर विविध यंत्रणांशी पत्रव्यवहार करुन पडताळणी केली. त्यावेळी संशयित कागदपत्र आढळळेल्यांचा गुन्ह्यात समावेश केला. एकंदरीत ७ महिने रखडलेल्या त्या तपासाला गती दिली. एसआयटीमध्ये पीआय बाबाराव अवचार, पीआय अतुल वर, पीआय समाधान वाठोरे, पीएसआय लोतडे यांचा समावेश होता.

संशयित कागदपत्रांची पडताळणी

बनावट जन्मदाखले प्रकरणाच्या तपासात आम्हाला तहसील कार्यालयाकडून संशयितांची कागदपत्रे दिली होती. त्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली. त्यामध्ये ज्यांच्या कागपत्रांमध्ये अनियमितता आढळली, त्यांचा गुन्ह्यात समावेश केला. तपास पूर्ण झाल्यामुळे ४९१ आरोर्पिविरुद्ध सुमारे १३०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. - एसीपी शिवाजी बचाटे, एसआयटी प्रमुख

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande