नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीसीए – एमसीए व बीएस्सी डेटा सायन्स शिक्षणक्रम २०२५-२६ साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी आणि परीक्षेच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या निर्देशानुसार सदर शिक्षणक्रमांच्या प्रवेश परीक्षा नोंदणीची नवीन मुदत दिनांक १६ सप्टेंबर ते दिनांक २८ सप्टेंबर २०२५ अशी असून प्रवेश परीक्षा घेण्याची नवीन मुदत दिनांक १६ सप्टेंबर ते दिनांक ३० सप्टेंबर २०२५ आहे.
नोंदणी आणि परीक्षा दोन्हीही २४ तास सुरू राहतील. विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी https://ycmapp.ycmou.org.in/login या अधिकृत लिंकवर जाऊन नोंदणी व परीक्षा प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भात दिनांक १३ जून २०२५ रोजी प्रसारित झालेल्या आधीच्या सूचनांप्रमाणे इतर सर्व अटी व नियम पूर्ववत लागू राहतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षानियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर