पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘जलप्रलय व्यवस्थापन’ पुस्तिकेचे प्रकाशन
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सांघिक प्रयत्नांवर आधारित ‘जलप्रलय व्यवस्थापन’ पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवें
अ


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सांघिक प्रयत्नांवर आधारित ‘जलप्रलय व्यवस्थापन’ पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

लातूर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसातील पूर परिस्थितीतील अनुभव, प्रशासनाने केलेले नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि बचावकार्य याविषयी माहितीचा या पुस्तिकेत समावेश आहे. आपत्तीसमयी प्रशासनाची तत्परता व सामूहिक कार्यपद्धती याचा सविस्तर तपशील यामध्ये मांडण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande