लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा - आ.निलंगेकर
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले स यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पूरस्थिती
आ


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

लातूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले स यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

यावेळी जिल्ह्यातील पूरस्थिती व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी नागरिकांचे विशेषतः शेतकरी बांधवांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधा देखील ठिकठिकाणी क्षतिग्रस्त झाल्या आहेत. लातूरच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठा प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजीरावजी काळगे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आ. रमेशअप्पा कराड, आ. अमित देशमुख, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे-ठाकूर तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande