अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परतवाडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतून समाजसेवेचा संदेश देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.हॉटेल मयुरी इन येथे भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात भाजप पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी शिबिराला भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले आणि त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. रक्तदानासारख्या उपक्रमातून जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी