ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा - शिल्पा नाईक
अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.) : महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत अंश महिला बचत गटातील लाभार्थी सुषमा गायकवाड यांना ई-पिंक रिक्षा मिळाला असून, या प्रसंगी अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांन
ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा  अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक


अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.) : महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत अंश महिला बचत गटातील लाभार्थी सुषमा गायकवाड यांना ई-पिंक रिक्षा मिळाला असून, या प्रसंगी अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्वतः या रिक्षामध्ये बसून सवारीचा आनंद घेतला. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक यांनी लाभार्थी महिलेची विचारपूस करत रिक्षा मिळविण्याची प्रक्रिया, आलेल्या अडचणी आणि पुढील रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, या माध्यमातून बचत गटातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत असून, त्या स्वावलंबी बनण्यास शासनाचे मोलाचे सहाय्य मिळत आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे आणि एन.यू.एल.एम. विभाग प्रमुख धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचा प्रसार व प्रसिद्धी करण्यात आली आहे. एन.यू.एल.एम. विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पिंक ई-रिक्षा योजना महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या आर्थिक सबलीकरणास हातभार लागत आहे. या उपक्रमामुळे अमरावती शहरात महिला सक्षमीकरणाला नवी चालना मिळत असून, महिलांना स्वावलंबनाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकण्याची संधी प्राप्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande