लातूर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। उदगीर येथे रिपाई आठवले च्या वतीने लिंगायत स्मशान भूमी फुलेनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उदगीर शहरात असलेल्या महात्मा फुले नगर येथील लिंगायत स्मशान भूमी मध्ये उदगीर चे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले , रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी रिपब्लिकन पक्षाचे उदगीर तालुका अध्यक्ष ॲड.प्रफुलकुमार उदगीरकर , ॲड. बालाजी कारभारी, युवा जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, नगर अभियंता अनिल कुरे, कवठे, शाहिद हाश्मी, प्रकाश कांबळे, नरेश चांदे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे उदगीर शहर अध्यक्ष सुधीर घोरपडे,अमोल पतंगे, मकबूल शेख , भीमराव सूर्यवंशी, इम्रान खान, शंकर वाघमारे, राहुल वाघमारे, खंडू कांबळे, संदीप मेघे, धोंडिबा गजीले, रणजित कांबळे,संतोष शिंदे,तसेच महिला शिल्पा कांबळे, उषा सकट, राधाबाई कांबळे, संगीता कांबळे, साधनाबाई वाघमारे, मुक्ता सगर, मंगल बाई मनसे, कमलबाई टेकाळे, कोकाटे बाई, अनुसयाबाई कांबळे, कमल सूर्यवंशी, ललिता कांबळे, मीरा गायकवाड , उषा गायकवाड, शीला गायकवाड, ललिता गायकवाड, पंचशीला सूर्यवंशी आदी सह शेकडो महिला कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी महात्मा फुले नगर येथील नागरिकांना होत असलेल्या विविध नागरी समस्या पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन चे विस्तारीकरण, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधकाम, विजेचे खांब, नाल्या गटारे स्वच्छता , घंटा गाडी ची व्यवस्था आदी समस्या यांचे लवकरात लवकर निराकरण करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिले
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis