इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदारांच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलन
पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। लोकमान्यनगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदारांच्या भूमिकेच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. याचा एक भाग म्हणून लोकमान्यनगर परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.लोकमान्यनगर येथील इमारतींच्या पु
इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदारांच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलन


पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

लोकमान्यनगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदारांच्या भूमिकेच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. याचा एक भाग म्हणून लोकमान्यनगर परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.लोकमान्यनगर येथील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी स्थगिती मिळवली आहे. त्यामुळे रहिवाशांवर अन्याय झाला, असे काही स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. सध्या इमारतींची परिस्थिती धोकादायक बनली आहे. ५३ इमारतींमधील ८०३ नागरिकांच्या घराचे स्वप्न भंग पावले आहे. परिसरात ६० वर्षांपेक्षा अधिक काळ वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक व त्‍यांची तिसरी पिढी येथे राहत आहे.येथील काही इमारती पडण्याच्या स्थितीत आहेत. प्रत्येक इमारतीची स्वतंत्र सोसायटी असल्याने दोन, तीन, चार इमारती एकत्र येऊन गेल्या १० वर्षांपासून पुनर्विकासाची प्रक्रिया राबवीत आहेत. दोन सोसायट्यांच्या नागरिकांची नवीन इमारत तयारसुद्धा झाली. इतर सर्व इमारतींचे पुनर्विकासाचे प्रस्ताव ‘म्हाडा’कडे पडून आहेत, परंतु अचानक कोणालाही न विचारात घेता स्थगिती मिळवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande