लातूर - भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
लातूर, 18 सप्टेंबर, (हिं.स.) भगवान विश्वकर्मा पूजन दिवसानिमित्त निलंगा नगरीतील पांचाळ कॉलनी येथील विश्वकर्मा मंदिर व लायन्स क्लब ऑफ लातूर हेल्पिंग हॅण्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने ''भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर'' आयोजित करण्यात आले. याकार्यक
अ


लातूर, 18 सप्टेंबर, (हिं.स.)

भगवान विश्वकर्मा पूजन दिवसानिमित्त निलंगा नगरीतील पांचाळ कॉलनी येथील विश्वकर्मा मंदिर व लायन्स क्लब ऑफ लातूर हेल्पिंग हॅण्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने 'भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर' आयोजित करण्यात आले.

याकार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहण्याची संधी भारतीय जनता पक्षाचे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मिळाली. समाजासाठी होत असलेल्या या जनोपयोगी कार्याचे कौतुक करून सर्वांना यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौरभ पांचाळ, लायन्स कल्बचे झोन चेअर पर्सन डॉ. अजय नारायणकर, कल्बच्या अध्यक्षा डॉ. अश्विनीताई नारायणकर, कृष्णा नेत्रालयचे डॉ. पवन सावंत आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande