पी.व्ही. सिंधूचा चायना मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
बीजिंग, 18 सप्टेंबर, (हिं.स.) पीव्ही सिंधूने चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. तिने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१५, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना फक्त ४१ मिनिटे च
पी. व्ही सिंधू


बीजिंग, 18 सप्टेंबर, (हिं.स.) पीव्ही सिंधूने चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. तिने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१५, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना फक्त ४१ मिनिटे चालला.दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती सिंधू सध्या जगात १४ व्या क्रमांकावर आहे. या विजयासह तिने चोचुवोंगविरुद्धची आपली कामगिरी ६-५ अशी सुधारली आहे.

सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित कोरियाच्या अन से यंग आणि डेन्मार्कची मिया ब्लिकफेल्ड यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी करावा लागणार आहे. दरम्यान, सिंधू हाँगकाँग ओपनच्या पहिल्या फेरीतच बाहेर पडली होती. चायना मास्टर्सचा सामना जिंकल्यानंतर ती म्हणाली, चोचुवोंग ही एक अव्वल बॅडमिंटनपटू आहे. मी इंडोनेशिया ओपनमध्येही तिच्याविरुद्ध खेळले होते आणि तेव्हाही तो एक कठीण सामना होता. पहिला गेम जिंकल्यानंतर, मी दुसऱ्या गेममध्ये अधिक सावध होते.

सिंधू पुढे म्हणाली, स्कोअर समान होता, त्यामुळे प्रत्येक गुण हा एक निकराचा सामना होता. मी जिंकले याचा मला आनंद आहे आणि मी माझे सर्वोत्तम दिले. आता मला पुढच्या सामन्याची तयारी करायची आहे. सरळ गेम जिंकल्याने नेहमीच आत्मविश्वास मिळतो.

सिंधू सध्या इंडोनेशियन पुरुष एकेरीचे माजी प्रशिक्षक इरवंस्याह आदि प्रतामा यांच्यासोबत सराव करत आहे. जे आता भारतीय महिला एकेरीचे प्रशिक्षक आहेत. या सहकार्याबद्दल ती म्हणाली, ते एक उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत. सुरुवातीला आम्हाला वेळ लागला, पण आता आम्हाला समजले आहे की, काय करावे लागेल आणि कोणते बदल आवश्यक आहेत. प्रशिक्षक म्हणून, ते आपले सर्वोत्तम देत आहे आणि एक खेळाडू म्हणून, माझे सर्वोत्तम देणे माझे कर्तव्य आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande