हिंडनबर्ग प्रकरणात अदानी समूहाला सेबीकडून ‘क्लीन चिट’
मुंबई,18 सप्टेंबर (हिं.स.) : अमेरिकन शॉर्ट-सेलर ''हिंडनबर्ग रिसर्च''च्या आरोपांवर अखेर भारतीय शेअर बाजार नियंत्रक संस्था सेबीने आपला निर्णय दिला असून, अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. सेबीने स्पष्ट केले आहे की, अदाणी समूहाविरोधात स्टॉक मार्के
सेबी लोगो


मुंबई,18 सप्टेंबर (हिं.स.) : अमेरिकन शॉर्ट-सेलर 'हिंडनबर्ग रिसर्च'च्या आरोपांवर अखेर भारतीय शेअर बाजार नियंत्रक संस्था सेबीने आपला निर्णय दिला असून, अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. सेबीने स्पष्ट केले आहे की, अदाणी समूहाविरोधात स्टॉक मार्केटशी संबंधित कोणतीही अनुचित प्रक्रिया झाल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.

सेबीने आपला अंतिम आदेश जाहीर करताना, गौतम अदानी, तसेच त्यांच्या समूहातील कंपन्या — अदाणी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदाणी पॉवर लिमिटेड आणि एडिकॉर्प एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरचे सर्व आरोप खारिज केले आहेत. सेबीने स्पष्ट केले की, या प्रकरणात आणखी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. यासंदर्भात सेबीच्या आदेशात नमूद करण्यात आले की, प्रकरणाचा सखोल विचार केल्यानंतर आम्ही कोणताही निर्देश न देता, नोटिस प्राप्तकर्त्यांविरुद्ध कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंडनबर्गचे आरोप काय होते..?

अमेरिकन वित्तीय संशोधन संस्था 'हिंडनबर्ग रिसर्च'ने 2023 मध्ये दावा केला होता की, एडिकॉर्प एंटरप्रायझेसचा वापर अदानी समूहातील इतर कंपन्यांमार्फत पैसे फिरवण्यासाठी व शेअर किमती कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी केला जात आहे. विशेषतः अदाणी पॉवर या सूचीबद्ध कंपनीला यामार्फत आर्थिक लाभ दिला गेल्याचा आरोप होता.

गौतम अदानींची प्रतिक्रिया

सेबीच्या निर्णयानंतर, अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (माजी ट्विटर) वर प्रतिक्रिया देताना लिहिले की, सेबीने यास स्पष्टपणे दुजोरा दिला आहे की, हिंडनबर्गचे आरोप निराधार होते. पारदर्शकता व प्रामाणिकपणा हा अदाणी समूहाचा पाया आहे. या खोट्या व हेतुपुरस्सर पसरवलेल्या रिपोर्टमुळे ज्यांनी गुंतवणुकीत नुकसान सोसले, त्यांच्या वेदना आम्हाला समजतात. असे अपप्रचार करणाऱ्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. भारताच्या संस्था, जनता व राष्ट्रनिर्मिती यावरील आमची निष्ठा अढळ असल्याचे अदानी यांनी नमूद केलेय.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande