खा. गोपछडे यांची धार्मिक अनुष्ठानाला भेट, सावेंचीही हजेरी
नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड येथे श्री श्री श्री १००८ केदारनाथ रावल, जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, केदारपीठ – ओखीमठ, जि. रुद्रप्रयाग (उत्तराखंड) यांच्या ५३ व्या अनुष्ठान प्रसंगी त्यांचे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे,
अ


नांदेड, 18 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड येथे श्री श्री श्री १००८ केदारनाथ रावल, जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, केदारपीठ – ओखीमठ, जि. रुद्रप्रयाग (उत्तराखंड) यांच्या ५३ व्या अनुष्ठान प्रसंगी त्यांचे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी दर्शन व आशीर्वाद घेतले. त्यांच्या सान्निध्यातून लाभलेली अनोखी सकारात्मकता, आध्यात्मिक ऊर्जा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा शांत अनुभव हा खरोखरच अविस्मरणीय क्षण ठरला. गुरूंच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वातून सेवा, श्रद्धा आणि समाजकल्याणाचे मौल्यवान संदेश मिळाले. या दिव्य भेटीने अध्यात्मिक मार्गावर नवी प्रेरणा आणि दृढ संकल्प प्राप्त झाला, यावेळी पालकमंत्री अतुल सावे,भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande