सिल्लोड तालुक्यात भाजप नेत्यांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : सिल्लोड तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सिल्लोड तालुक्यातील नेते पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : सिल्लोड तालुक्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सिल्लोड तालुक्यातील नेते पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून नाल्यातील पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने उभी केलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर गंभीर संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर, आमठाणा -धावडा-घाटनांद्रा-चारनेर-चारनेरवाडी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणे कठीण असले तरी प्रशासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. यावेळी भाजपा प्रदेश सचिव सुरेश बनकर , सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोठे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक दादा गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काका दाणेकर, काकासाहेब मोरे, रामचंद्र मोरे, संजय निकम, कृष्णा मोरे,विलास तायडे,सुकलाल राजपुत , संजय अंभोरे, विठ्ठल कानपाटे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande