लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।अहमदपूर शहरातील लातुर रोडवरील प्रसाद गार्डन च्या पाठीमागील साई नगर येथील गोविंद भगत या 55 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गच्चीवर असलेल्या पत्र्याच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली असुन अहमदपूर पोलीसात या घटनेची आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे
याविषयी मिळालेली माहीती अशी की, गोविंद भगत वय 55 वर्ष रा साई नगर अहमदपूर येथील रहीवाशी असुन तीन भावात मिळून तीन एकर जमिन आहे ते एका बांधकाम गुत्तेदाराकडे गेली 4O वर्ष मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते त्यांना एक मुलगा 20 वर्षाचा असुन तो बि. ए द्वितीय वर्षात शिक्षण घेत घेत हाताला मिळेल तो काम करत असतो तसेच त्यांना दोन मुली असुन त्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे
त्यांनी आपल्या राहत्या घरी गच्चीवरील पत्र्याच्या रूममध्ये लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजतात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असता मयताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली मला नोकरी नाही माझ्या मुलाला नोकरी नाही मुलगा बि. ए द्वितीय वर्षात शिकत आहे शिक्षणासाठी आणि नोकरी साठी पैसे मिळत नाहीत कुठल्याही सरकारच्या योजना मिळत नाहीत मि याला कंटाळून फाशी घेत आहे अशी माहीती पोलीसांनी दिलीत्यांच्यावर बचत गट दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज खाजगी बँकेचे कर्ज , सरकारी बँकेच्या कर्जासह इतरही काही कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगीतलेया घटनेची अहमदपूर पोलीसात अकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis