लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
आज हलगरा, तांबरवाडी, हालसी व औराद शहाजनी येथे अतीवृष्टी ची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वास दिला.अतिवृष्टीने शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरसकट लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करणे व शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे...
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis