दिव्यांग- अव्यंग विवाह; जोडप्यांना ५० हजार रुपये अनुदान
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहनपर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या कार्यालयाकडून विवाहित जोडप्यास ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोड
दिव्यांग- अव्यंग विवाह; जोडप्यांना ५० हजार रुपये अनुदान


छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहनपर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्या कार्यालयाकडून विवाहित जोडप्यास ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडप्यापैकी एक व्यक्ति दिव्यांग असावी व दुसरी व्यक्ती अव्यंग असावी.

योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, वर वधू यांचा फोटो, शासकीय कार्यालयात विवाहाची नोंद केलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ४० टक्के किंवा त्यापेक्ष अधिक दिव्यांगत्व असल्याचे UDID प्रमाणपत्र, दोघांचे स्वयंघोषणा पत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वर्तणूकीबाबत प्रतिष्ठित व्यक्तिंचे शिफारस पत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बॅंकेचे संयुक्त खाते इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. विवाहास एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande