परभणी, 19 सप्टेंबर (हिं.स.)। कौसडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रंजना हनुमान सोमानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी आर. एस. ईडोळे यांनी रंजना सोमानी यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
ग्रामपंचायतीत यापूर्वी उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे हे पद अनेक दिवस रिक्त होते. त्यानंतर आज घेण्यात आलेल्या निवडणुकीस १५ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. एकमेव अर्ज दाखल झाल्याने रंजना सोमानी यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
निवड घोषित होताच ग्रामस्थांच्या वतीने रंजना सोमानी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सरपंच मोबिन कुरेशी, हनुमान सोमानी, हेमंत अग्रवाल, प्रशांत वाघीकर, ज्ञानेश्वर जीवणे, शिवाजी वाघमारे, महादू तायडे, अखिल पठाण, मुरली घुगे, ज्ञानेश्वर बारवकर, दत्ता काळे, आवेस पाटील, गुलाम पाशा, भारत जीवणे, बाळू देशमुख, उत्तम सांगोळे, रमेश उंबरे, कैलास राठोड, शेख एजाज, बालासाहेब बहिरट, अशोकराव कुलकर्णी, वाजेद अन्सारी, शेख अब्दुल कलाम, बाबुराव एकनाथराव ईखे, सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी एच. डी. धरणी, पोलीस निरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार कोकाटे यांनी ग्रामपंचायत परिसरात बंदोबस्त ठेवला होता. गावभर जल्लोषाचे वातावरण असून, उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर रंजना सोमानी यांचे अभिनंदन सर्वत्र होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis