छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। :खुलताबाद तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नवीन महिला कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहेखुलताबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष श्री.सुनीलजी तटकरे महिला प्रदेशाध्यक्षा .रूपाली चाकणकर आणि जिल्हाध्यक्ष श्री.सतीशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यतेने खुलताबाद तालुक्यातील नवीन महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी:
तालुकाध्यक्षा: .अंजू वैभव नागेतालुका
कार्याध्यक्षा: गीता संतोष आधाने
शहराध्यक्षा: अफसाना बेगम गुलाम मेहमूद.
या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्या शोभा खोसरे, महिला जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, शहराध्यक्ष गजानन फुलारे, सोमीनाथ अधाने, बबनराव नलावडे, राष्ट्रवादी सा.न्याय तालुकाध्यक्ष केशव वाघ, डॉ.जाकिर शहा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis