लातूर - बँक स्तरावर 100 टक्के वसुली दिलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाचा सत्कार
लातूर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने वसुली हंगाम 2024-25 मध्ये लातूर तालुक्यात बँक स्तरावर 100 टक्के वसुली दिलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाचा सत्कार करण्यात करून त्यांचे कौतुक केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक नि
अ


लातूर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने वसुली हंगाम 2024-25 मध्ये लातूर तालुक्यात बँक स्तरावर 100 टक्के वसुली दिलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थाचा सत्कार करण्यात करून त्यांचे कौतुक केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आर्थिक नियोजनातून राज्य व देशात लौकिक प्राप्त केला आहे. शेतक-यांना कर्ज वितरण करत असताना त्यात समानता आणून तत्पर सेवा देण्याचे काम लातूर जिल्हा बँकेने सातत्याने केले आहे.

आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्यामुळेच लातूर जिल्हा बँकेने अनेक चांगल्या योजना आखल्या व त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे केली.सर्व सामान्य शेतक-यांना इतर बँकेकडून कर्ज प्राप्तीसाठी योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने लातूर जिल्हा बँकेने बिनव्याजी कर्जाचे धोरण अंमलात आणले.

जिल्हा बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी सेवा संस्थांनी दिलेले योगदान मोठे असून सेवा संस्था अधिक सक्षम कशा होतील यासाठी प्रयत्न नेहमीच असणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande