रामकृष्ण-गोदावरी उपसा जलसिंचन योजना शासनाने ताब्यात घेऊन सुरु करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। रामकृष्ण-गोदावरी उपसा जलसिंचन योजणा शासनाने ताब्यात घेऊन सुरु करणे बाबत आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नागरिकांनी भेट घेऊन मागणी करण्यात आली. वैजापूर तालुक्यातील १४ गावासाठी रामकृष्ण-गोदावरी
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

रामकृष्ण-गोदावरी उपसा जलसिंचन योजणा शासनाने ताब्यात घेऊन सुरु करणे बाबत आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नागरिकांनी भेट घेऊन मागणी करण्यात आली.

वैजापूर तालुक्यातील १४ गावासाठी रामकृष्ण-गोदावरी उपसा जलसिंचन संस्था कार्यान्वित करण्यात आलेली होती. या संस्थेवर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्यापैकी ६३ कोटी ३७ लाख रु. कर्ज माफी फडणवीस सरकारने व १४५ कोटी रु. ची व्याज माफी छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी माफी केलेली आहे. शेतकऱ्यांचे सातबारे त्यामुळे कोरे झाले असून सदरील योजना हि वापराविना पडून आहे. व तिची मालकी कोणाची आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. म्हणून जलसंपदा विभागाने या योजनेचा तत्काळ सर्व्हे करून सदरील योजना कार्यान्वित करून १४ गावातील तलाव हे भरण्याचे नियोजन वेळोवेळी केले तर या भागातील पिण्याच्या पाण्याचा व काही अंशी शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande