महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारणीची बैठक संपन्न
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी दिलेला नारा “वोट चोर, गद्दी छोड“ नुसार आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सजग राहून कार्य करावे तसेच जनसुरक्षा कायदा, जो लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याला अत्यंत
मुंबई


मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी दिलेला नारा “वोट चोर, गद्दी छोड“ नुसार आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सजग राहून कार्य करावे तसेच जनसुरक्षा कायदा, जो लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याला अत्यंत मारक आहे, त्याविरोधात जनजागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास केशवराव औताडे यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारणीची बैठक मुंबई येथे गांधी भवन कार्यालयात प्रदेशाध्यक्ष विलास केशवराव औताडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हानिहाय प्रशिक्षित कार्यकर्ते नेमून, बूथ निहाय मतदारांची समीक्षा करविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत प्रदेश कार्यकारणीचे सदस्य, जिल्हा व शहर अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande