‘ऑपरेशन सिंदूर’ : लश्कर-ए-तैयबाने व्हिडिओद्वारे स्वत:च दिली नुकसानाची माहिती
इस्लामाबाद, 19 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या नुकसानाची माहिती अद्यापपर्यंत लपवून ठेवली होती, मात्र अलीकडेच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास कश्मिरी याने या संदर्भातील सत्य उघड केले. आता लश्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी व्हिडी
ऑपरेशन सिंदूरबाबत लष्कर कमांडरने दिली मोठी कबुली


इस्लामाबाद, 19 सप्टेंबर (हिं.स.)। पाकिस्तानने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान झालेल्या नुकसानाची माहिती अद्यापपर्यंत लपवून ठेवली होती, मात्र अलीकडेच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास कश्मिरी याने या संदर्भातील सत्य उघड केले. आता लश्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो मुरीदकेमध्ये झालेल्या नुकसानाविषयी सांगतो आहे.

भारतीय लष्कराने मुरीदकेमध्ये असलेल्या लष्करच्या दहशतवादी ठिकाणावर जोरदार हल्ला करून ते उध्वस्त केले होते. सध्या त्या ठिकाणाची पुन्हा उभारणी सुरू आहे. लश्करच्या कमांडरने पाकिस्तानच्या खोटेपणाचा पर्दाफाश केला आहे. खरंतर, लश्करचा कमांडर कासिम याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्याने पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचे खंडन केले आहे. कासिमने म्हटले, “मी सध्या मुरीदके येथील मरकज-ए-तैयबा कॅम्पसमोर उभा आहे, जो ऑपरेशन सिंदूरदरम्यान पूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. आता त्याचे पुन्हा बांधकाम सुरू आहे. ही मशीद पूर्वीपेक्षा खूप मोठी होईल. इथून अनेक मोठे मुजाहिदीन (दहशतवादी) तयार झाले आहेत.”

या व्हिडीओमध्ये कासिमने नष्ट झालेल्या मरकज-ए-तैयबा कॅम्पचे दृश्य दाखवले आहे, जो आता खंडहर झाला आहे. त्याने हे देखील सांगितले की, याच ठिकाणी अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. यातील विशेष बाब म्हणजे कासिमने एका नव्या ठिकाणाचाही खुलासा केला आहे, जे लवकरच दहशतवाद्यांची नवीन ‘फॅक्टरी’ बनेल.

दुसऱ्या व्हिडीओमध्ये कासिम म्हणतो, “आज १५ सप्टेंबर आहे, आणि मी पाकिस्तानातील अशा एका ठिकाणी आहे, जिथे दौरा-ए-सुफ्फा नावाचा कोर्स शिकवला जातो. या कोर्सअंतर्गत दहशतवाद्यांना घोडेस्वारी, पोहणे आणि इतर अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.” लश्कर आणि जैशचे कमांडर आता नवीन दहशतवाद्यांची भरती करण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी प्रशिक्षण शिबिरे (ट्रेनिंग कॅम्प) तयार करण्यात आली आहेत, जिथे त्यांना हत्यारांचं प्रशिक्षण दिले जाते.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एकूण ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. पाकिस्तानने आजवर या दहशतवाद्यांविषयी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता त्याचं खोत बाहेर येऊ लागलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande