रशियामध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
मॉस्को, 19 सप्टेंबर (हिं.स.)। रशियाला पुन्हा एकदा एका शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले आहे. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचाट्का द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर शुक्रवारी, 19 सप्टेंबरच्या पहाटे 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे इमारती हादरल्या आणि अध
रशियामध्ये भूकंप


मॉस्को, 19 सप्टेंबर (हिं.स.)। रशियाला पुन्हा एकदा एका शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले आहे. रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कामचाट्का द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर शुक्रवारी, 19 सप्टेंबरच्या पहाटे 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे इमारती हादरल्या आणि अधिकार्यांनी त्सुनामीचा इशारा जारी केला. मात्र,अहवालानुसार काही वेळानंतर हा त्सुनामी इशारा मागे घेतला गेला.

अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र पेट्रोपावलोव्स्क-कामचाट्स्की शहरापासून 128 किलोमीटर पूर्वेला आणि जमिनीपासून 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर होते. दुसरीकडे, रशियाच्या सरकारी भूभौगोलिक संस्थेच्या स्थानिक शाखेनुसार भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी होती आणि त्यांनी किमान 5 भूकंपीय झटके झाल्याची नोंद दिली आहे. याआधी गेल्या शनिवारी देखील या भागात तीव्र भूकंपाचे झटके जाणवले होते.

कामचाट्का प्रांताचे राज्यपाल यांनी देखील भूकंपासंबंधी माहिती दिली असून ते म्हणाले, “सध्या कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र बचाव पथकांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने शेजारच्या तटीय भागांमध्ये धोकादायक त्सुनामी लाटांचा इशारा दिला होता, परंतु काही तासांनंतर त्यांनी स्पष्ट केले की आता धोका टळला आहे.

रशियाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओंमध्ये घरातील फर्निचर आणि पंखे जोरात हलताना दिसून आले, तर एका अन्य व्हिडीओमध्ये रस्त्यावर उभी असलेली कारही पुढे-पाठ फिरताना दिसली.

जुलै महिन्यात या भागात 8.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यामुळे त्सुनामी आली होती. त्या वेळी तटीय गावाचा काही भाग समुद्रात वाहून गेला होता आणि जपानपासून अमेरिकेपर्यंत संपूर्ण प्रशांत महासागर किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.

कामचाट्का द्वीपकल्प हा “रिंग ऑफ फायर” नावाच्या टेक्टॉनिक पट्ट्यावर स्थित आहे, जो प्रशांत महासागराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये पसरलेला आहे. हे क्षेत्र भूकंपीय घडामोडींसाठी प्रसिद्ध हॉटस्पॉट मानले जाते. या भागात वारंवार शक्तिशाली भूकंप होण्याचे हेच मुख्य कारण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande