मुंबईत आयफोन १७ खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)।भारतामध्ये अँपलच्या आयफोन 17 सीरीज लॉन्च झाला आहे. या फोनची लोक आतुरतेने वाट पाहत होते. लॉन्चच्या दिवशी, म्हणजे आज, शुक्रवार मुंबईच्या बीकेसी येथील जिओ सेंटरमधील अँपल स्टोअरच्या बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली.या गर्दीदरम्
मुंबईत आयफोन १७ खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी


मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)।भारतामध्ये अँपलच्या आयफोन 17 सीरीज लॉन्च झाला आहे. या फोनची लोक आतुरतेने वाट पाहत होते. लॉन्चच्या दिवशी, म्हणजे आज, शुक्रवार मुंबईच्या बीकेसी येथील जिओ सेंटरमधील अँपल स्टोअरच्या बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली.या गर्दीदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि काही लोकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

आयफोन 17 सीरीजच्या लॉन्चच्या निमित्ताने मुंबईतील बीकेसी येथील अँपल स्टोअरबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. याच दरम्यान, गर्दीमध्ये काही लोकांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. नंतर सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही झळकला आहे. आयफोन 17 खरेदी करण्यासाठी लोक सकाळपासूनच रांगेत उभे होते आणि काही लोक तर रात्रभर जागून फोन मिळवण्यासाठी वाट पाहत होते.

अँपलने आजपासून भारतात अधिकृतपणे आयफोन 17 सीरीजची विक्री सुरू केली आहे. एका ग्राहकाने सांगितले कि,

“मी आयफोन 17 प्रो मॅक्स खरेदी केला आहे – एक 256GB आणि दुसरा 1TB व्हेरिएंट. मी रात्री १२ वाजल्यापासून रांगेत होतो आणि आता मला तो मिळाला आहे. यामध्ये नवीन फिचर्स आहेत. नारिंगी रंग पहिल्यांदाच आला आहे.”मुंबईतील बीकेसी अँपलन स्टोर मध्ये आलेले आणखी एक ग्राहकाने सांगितले कि, “मी नारिंगी रंगाचा आयफोन 17 प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी आलो आहे. मी रात्री ८ वाजल्यापासून वाट पाहत आहे. यावेळी कॅमेरा आणि बॅटरीमध्ये बदल आहेत, आणि लुकही खूप वेगळा आहे.”दरम्यान, अँपल ने आज दिल्लीत देखील अयोफोन 17 सीरीजची विक्री सुरू केली आहे. दिल्लीतील साकेत येथील अँपल स्टोअरच्या बाहेरही लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande