पूरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा” – परभणी फाउंडेशनचे आवाहन
परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सध्या पूरग्रस्त बांधव गंभीर संकटात सापडले असून त्यांना दिलासा देण्यासाठी परभणी फाउंडेशनतर्फे “एक हात मदतीचा” ही मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी जीवनावश्यक किट किंवा त्यातील काही साहित्य देऊन या उपक्रमात सहभागी
पूरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा” – परभणी फाउंडेशनचे आवाहन


परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

सध्या पूरग्रस्त बांधव गंभीर संकटात सापडले असून त्यांना दिलासा देण्यासाठी परभणी फाउंडेशनतर्फे “एक हात मदतीचा” ही मदत मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी जीवनावश्यक किट किंवा त्यातील काही साहित्य देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एका जीवनावश्यक किटमध्ये छोटा 10 रुपयांचा अंगाचा साबण, छोटं डिटर्जंट पाकीट, पाव किलो चिवडा पाकीट, क्रीम बिस्किट पुडा, ग्लुकोज बिस्किट पुडा, पॅरासिटामोल गोळ्यांची स्ट्रीप, छोटा टूथपेस्ट, मच्छर अगरबत्ती (एक पॉकेट) व मोठ्या मेणबत्त्या (दोन नग) यांचा समावेश आहे.

परभणी फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले की, एक किट, दोन किट किंवा यातील काहीही साहित्य नागरिक आपल्या सामर्थ्यानुसार देऊ शकतात. छोट्याशा मदतीनेही पूरग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

मदत स्वीकारण्याची ठिकाणे व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत –

जवादे हॉस्पिटल समोर, बाईक कार पॉइंट (यादव कुशन वर्क), वसमत रोड, परभणी

संपर्क : 9527663946 / 9421347334 / 9822572353 / 8830106528

ज्ञानवर्धिनी अभ्यासिका, प्रभावती नगर पाटी जवळ, जुना पेडगाव रोड, परभणी

संपर्क : 7264955878 / 9545575000 / 9921144842

पी. के. सोल्युशन कॉम्प्युटर सेल्स अँड सर्विस, गणपती चौक, जिंतूर रोड, परभणी

संपर्क : 9284050620 / 9921144842 / 7020738199

परभणी फाउंडेशनने आवाहन केले आहे की, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande