गंगाखेड शहरातील पूरग्रस्तांची पाहणी – आ. रत्नाकर गुट्टेंच्या आदेशानंतर नगरसेवकांचा तातडीचा पाठपुरावा
परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। सुट्टीच्या दिवशीही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून नगरसेवकांनी दाखवलेली जबाबदारी शहरात कौतुकास्पद ठरत आहे. गंगाखेड शहरातील बरकत नगर व महबूबनगर परिसरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभू
गंगाखेड शहरातील पूरग्रस्तांची पाहणी – आमदार गुट्टे यांच्या आदेशानंतर नगरसेवकांचा तातडीचा पाठपुरावा


परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

सुट्टीच्या दिवशीही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून नगरसेवकांनी दाखवलेली जबाबदारी शहरात कौतुकास्पद ठरत आहे. गंगाखेड शहरातील बरकत नगर व महबूबनगर परिसरात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या आदेशानंतर माजी नगरसेवक सत्यपाल साळवे व माजी नगरसेवक सय्यद अकबर भाई यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने उपाययोजना राबवल्या.

पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या समस्यांची माहिती घेऊन पंचनामे करण्याचे निर्देश मंडळ अधिकारी यांना देण्यात आले. त्यानंतर मंडळ अधिकारी शंकर राठोड व तलाठी रुपेश गौतम यांनी तत्परतेने पंचनामे करण्यास सुरुवात केली. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नगरसेवकांनी स्वतःहून पाठपुरावा करत प्रशासनाशी समन्वय साधला.

माजी नगरसेवक सत्यपाल साळवे व माजी नगरसेवक तसेच मित्र मंडळाचे शहराध्यक्ष सय्यद अकबर भाई यांनी नागरिकांना दिलासा देत आश्वासन दिले की, पूरग्रस्त बांधवांना शासनस्तरावरून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

शहरातील नागरिकांमध्ये या कार्यामुळे समाधानाचे वातावरण असून, सुट्टीच्या दिवशीसुद्धा जनतेच्या अडचणी निवारणासाठी केलेला नगरसेवकांचा पुढाकार जनतेच्या सेवेसाठी खरी बांधिलकी असल्याचे चित्र दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande