परभणी : पेडगावात रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। रेणुकामाता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने पेडगाव येथे आयोजित रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान तसेच रक्तगट तपासणी करून सा
पेडगाव येथे रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, 28 सप्टेंबर (हिं.स.)। रेणुकामाता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने पेडगाव येथे आयोजित रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान तसेच रक्तगट तपासणी करून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवून दिली आहे. दिवसभर सुरू राहणाऱ्या या शिबिरात आणखी अनेक रक्तदाते सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला.

रेणुकामाता नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने रक्तदात्यांचे स्वागत करण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “रक्तदान ही एक महतीची देणगी असून एका रक्तदात्यामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला हातभार लावावा.”

गावात धार्मिक आणि सामाजिक जाणिवेची सांगड घालणारा हा उपक्रम नवरात्र महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरला असून गावातील तरुणवर्गाने दाखवलेला उत्साह प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande