नांदेड तालुक्यात पूरात अडकलेल्या सहा नागरिकांची सुखरूप सुटका
नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)। मौजे बोंढार तर्फे नेरली (ता. नांदेड) येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आसना नदीला आलेल्या पुरामुळे रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांच्या शेतातील फार्मवर सहा नागरिक अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन
अ


नांदेड, 28 सप्टेंबर (हिं.स.)।

मौजे बोंढार तर्फे नेरली (ता. नांदेड) येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आसना नदीला आलेल्या पुरामुळे रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांच्या शेतातील फार्मवर सहा नागरिक अडकून पडले होते. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे अखेर सर्वांचा थरारक बचाव करण्यात यश आले.

अडकलेल्यांमध्ये व्यंकट दत्ता वरपडे (40), छाया व्यंकट वरपडे (35), संस्कृती व्यंकट वरपडे (13), दिगंबर बाजीराव पाथरपल्ले (55), सुमनबाई दिगंबर पाथरपल्ले (40) व बाजीराव दिगंबर पाथरपल्ले (21) यांचा समावेश होता.

बचावासाठी तलाठी डी. एम. पाटील व रामराव गोपाळराव शिंदे (हळदेकर) यांनी स्वतः पाण्यात उतरून रसीच्या सहाय्याने, तसेच गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे अखेर सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेमुळे स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे धाडस तसेच तत्परता अधोरेखित झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande