पुणे पालिकेतील ९ गावांच्या डीपीसाठी मुदतवाढ
पुणे, 3 सप्टेंबर (हिं.स.)।गावे समाविष्ट होऊन आणि वारंवार मुदतवाढ देऊनही गेल्या आठ वर्षांत महापालिका प्रशासनाला नऊ गावांचा विकास आराखडा तयार करता आलेला नाही. अखेर जानेवारी महिन्यापासून गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य सरकारच्या नगररचना विभ
पुणे पालिकेतील ९ गावांच्या डीपीसाठी मुदतवाढ


पुणे, 3 सप्टेंबर (हिं.स.)।गावे समाविष्ट होऊन आणि वारंवार मुदतवाढ देऊनही गेल्या आठ वर्षांत महापालिका प्रशासनाला नऊ गावांचा विकास आराखडा तयार करता आलेला नाही. अखेर जानेवारी महिन्यापासून गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य सरकारच्या नगररचना विभागाने सुरू केले आहे.

मात्र, त्यासाठी सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती. ही मुदत समाप्त होत असल्याने नगररचना विभागाने विकास आराखडा तयार करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे टप्याटप्याने समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात म्हणजे ४ ऑक्टोंबर २०१७ मध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली.

त्यामध्ये लोहगाव आणि मुंढव्यातील उर्वरित भाग, साडेसतरानळी, उत्तमनगर, शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर जवळपास एक वर्षांनी म्हणजे ४ डिसेंबर २०१८ मध्ये या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला.

परंतु, २०१९ मधील लोकसभा, विधानसभा तसेच वाढीव हद्दीतील पोटनिवडणुका लागल्या. त्या झाल्यानंतर २०२० फेब्रुवारीपासून राज्यात करोनाचा संसर्ग सुरू झाला. परिणामी, प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम रखडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande