सोलापूर : पोलीस अधीक्षकांकडून विसर्जन स्थळाची पाहणी
सोलापूर, 3 सप्टेंबर (हिं.स.) : मोहोळ शहर व परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मुर्तिचे विसर्जन सीना नदीवरील कोळेगाव-लांबोटी येथील जुन्या पुलावर केले जाते. या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाची पाहणी करून बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीसांना आवश्यक सूचना देण्
Polcie


सोलापूर, 3 सप्टेंबर (हिं.स.) : मोहोळ शहर व परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मुर्तिचे विसर्जन सीना नदीवरील कोळेगाव-लांबोटी येथील जुन्या पुलावर केले जाते. या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाची पाहणी करून बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीसांना आवश्यक सूचना देण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवार ता 2 रोजी विसर्जन स्थळाला भेट देऊन विसर्जनाच्या वेळी घ्यावयाची दक्षता व प्रशासनाने केलेल्या व्यवस्थे बाबतची माहिती अधिक्षक कुलकर्णी यांनी दिली.

यावेळी त्यांनी विसर्जन स्थळी सुरक्षितता, प्रखर प्रकाशाची व्यवस्था, निष्णात पोहणाऱ्या व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पाण्याचा प्रवाह व खोली, याचा अंदाज घेऊन सीना नदीच्या पात्रात तीव्र प्रवाह व खोल पाण्यात विसर्जन टाळावे. पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande