छ. संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता; अविनाश गलांडे अध्यक्ष, जितेंद्र जैस्वाल उपाध्यक्ष
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. अध्यक्षपदी अविनाश पाटील गलांडे, तर उपाध्यक्षपदी फुलंब्रीचे जितेंद्र बाबा जैस्वाल
अ


अ


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. अध्यक्षपदी अविनाश पाटील गलांडे, तर उपाध्यक्षपदी फुलंब्रीचे जितेंद्र बाबा जैस्वाल यांची निवड करण्यात आली.

ही निवडणूक अत्यंत नाट्यमय घडामोडींमध्ये पार पडली. मतदानापूर्वी जिल्हा परिषदेत विविध राजकीय हालचालींना वेग आला होता. विशेष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तटस्थ भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला.

अखेर भाजपने बाजी मारत जिल्हा परिषदेत आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकारणाला नव्या दिशेची चाहूल लागली आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande