
लातूर, 18 मार्च (हिं.स.)।
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर नगरपालिकेत, अहमदपूर– चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर, लातूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दयानंद सुरवसे यांची नियुक्ती झाल्यानंतर आज सर्वच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात अहमदपूरचे उपनगराध्यक्ष अय्याज शेख, लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे , अहमदपूर व चाकूर पंचायत समितीचे सभापती , अहमदपूरचे सर्व नगरसेवक व चाकूर व अहमदपूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सदस्या यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत त्यांनी सर्वच नवनिर्वाचित जिल्हा परिषद उपाध्यक्ष, नगरपरिषद उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती समिती सदस्य यांचा स्नेहपूर्वक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
त्या म्हणाले की आपण अधिक जोमाने काम करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध रहा. शासन म्हणून मी व तुमचे सर्वांचे नेते मंत्री बाबासाहेब पाटील तुमच्यासाठी कटिबद्ध आहेत. अहमदपूर आणि चाकूर साठी मी कधीही निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना दिली.
राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, अहमदपूरचे सभापती सुरज पाटील, अहमदपूरचे उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, चाकूर पंचायत समिती सभापती जयश्री मच्छिंद्र नागरगोजे सह अहमदपूर शहराचे सर्व नगरसेवक, दोन्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis