उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाह
उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी तर शहरी भागातील आरोग्य यंत्रणेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सूचना दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंशापर्यंत पोहोचला आहे. ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील तीन महिने ४२ ते ४५ अंशांच्या घरात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते.

अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन या सह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande