पालघर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला तब्बल अकरा वर्षांनंतर जिल्हा परिषदेकडून कार्यरत पदाधिकारी व खातेप्रमुखांच्या दैनंदिन कामकाजासाठी १२ नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी वाजता जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात या वाहनांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर गणेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, महिंद्रा कंपनी च्या सीईओ निधी मोदी, अधिकारी कैलास जोशी,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालघर जिल्हा स्थापन झाल्यानंतर २०१४ मध्ये पहिल्यांदा नऊ वाहने खरेदी करण्यात आली होती. मात्र ती वाहने सलग अकरा वर्षे वापरल्याने नादुरुस्त झाली. त्यानंतर ५ जून २०२५ रोजी निर्लेखित वाहनांच्या जागी नवीन वाहने घेण्यास शानाकडून मान्यता मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय खरेदी समितीने ग्रामीण भागात वापरण्यात उपयुक्त ठरतील अशी वाहने निवडण्याचा निर्णय घेतला.
GEM पोर्टल द्वारे महिंद्रा कडे संपर्क साधून 12 वाहने खरेदी करण्यात आली आहेत.कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, नवीन वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या कामासाठी जिल्ह्यात दौरे करणे सोयीचे झाल्याने कामकाज अधिक गतिमान आणि कार्यक्षम होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL