परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व शेतकरी, सभासद आणि खातेदारांना त्वरीत केवायसी KYC (Know Your Customer) अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुचनेनुसार बँकेत असलेली खाती सक्रीय ठेवण्यासाठी आधारकार्ड व पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत संबंधित शाखेत जमा करणे बंधनकारक आहे, असे बँकेच्या प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
निर्धारित वेळेत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास बँकींग व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा बँकेने दिला आहे. तसेच खातेदारांनी आपल्या खात्यात वारसाची नोंद करून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बँकेचे अध्यक्ष सुरेशराव वरपुडकर, उपाध्यक्ष राजेश साहेबराव पाटील तसेच संचालक मंडळाने खातेदारांना केवायसी अपडेटसाठी आवश्यक ती पावले त्वरित उचलण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis