परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
परभणी येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज (ता. ४) प्रभाग समिती अ, नटराज रंगमंदिर तसेच प्रभाग समिती क, कल्याण मंडपम येथे प्रसिद्ध करण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी प्रभाग समिती क, कल्याण मंडपम येथे भेट देऊन प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी केंद्राची पाहणी केली. यावेळी सहायक आयुक्त जुबेर हाश्मी, कर अधीक्षक नसीरोद्दीन काजी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis