पहिल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार राजेंद्र गहाळ
वसमतला होणार संमेलन परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी येथील ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांची संस्कृती सेवाभावी संस्था, परभणी, आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गुरूवारी निवड करण्यात आली आहे. संस्कृती सेवाभा
परभणी


वसमतला होणार संमेलन

परभणी, 4 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी येथील ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांची संस्कृती सेवाभावी संस्था, परभणी, आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गुरूवारी निवड करण्यात आली आहे.

संस्कृती सेवाभावी, संस्था, परभणीच्या वतीने पहिले राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन वसमत, जिल्हा हिंगोली येथे 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. संयोजन समितीची बैठक संस्थेचे अध्यक्ष किरण खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस संस्थेचे सचिव सिद्धार्थ कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.

समितीच्या बैठकीत गहाळ यांची संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राजेंद्र गहाळ परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कोंडी, दोन एकर, पोशिंदा कथासंग्रह प्रकाशित असुन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कथाचा समावेश करण्यात आला आहे.

या निवडी बद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. विजयराव गव्हाणे, उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अँड. अशोक सोनी, सचिव दादासाहेब देशमुख, सहसचिव अजयराव गव्हाणे, दादासाहेब नाईकवाडे, प्राचार्य तुळशीराम वानरे आदीसह सर्व मित्रपरिवाराकडुन अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande