सोलापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।
जिल्हा रेशीम कार्यालय,सोलापूर यांच्यावतीने“रेशीम विभाग आपल्या दारी”ही विशेष मोहीम दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी रेशीम योजनेसाठी नोंदणी केलेल्या,परंतु तुती लागवड न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम उद्योगाची माहिती देणे,उद्योग सुरू करण्याचे आवाहन करणे आणि तुती लागवड न करण्यामागील कारणांचा अभिप्राय घेणे,हा या मोहिमेचा उद्देश आहे,अशी माहिती जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार यांनी दिली आहे.
रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत असून,अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाते. एका गावातील किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने ग्राम रोजगार सेवकांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज करावा लागतो. प्रति एकर ₹५०० नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड