पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज
पालघर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात उद्या (5 सप्टेंबर) काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 सप्टेंबर रोजी देखील
पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज


पालघर, 4 सप्टेंबर (हिं.स.)।

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात उद्या (5 सप्टेंबर) काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

6 सप्टेंबर रोजी देखील जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र 7 सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील पाच दिवस जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सरासरी 30 ते 33 अंश सेल्सिअस इतके राहील. वाऱ्याचा वेग 6 ते 13 किमी प्रतितास असा राहणार आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांनी काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande