रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी सादर झालेल्या २७ प्रस्तावांमधून ९ शिक्षकांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी सादर झालेल्या २७ प्रस्तावांमधून ९ शिक्षकांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

गणेशोत्सवानंतर लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. निवड करण्यात आलेले शिक्षक असे - मंडणगड जि.प. पू. प्राथमिक मराठी शाळा बामणघर पदवीधर शिक्षक संजय करावडे, दापोली - जि.प. आदर्श प्राथमिक शाळा वाकवली क्र. 1 उपशिक्षक जावेद शेख, खेड- जि.प. पू. प्राथमिक शाळा सवेणी क्र. 1 पदवीधर शिक्षक एकनाथ पाटील, चिपळूण - पाग मुलांची पदवीधर शिक्षक नरेश मोरे, गुहागर - जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा जानवळे क्र. 1 उपशिक्षक चंद्रकांत बेलेकर, संगमेश्वर- जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा हातीव क्र. पदवीधर शिक्षक विनय होडे, रत्नागिरी - जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा भोके आंबेकरवाडी पदवीधर शिक्षक प्रदीप जाधव, लांजा - जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा वाकेड क्र. 1 उपशिक्षक नितीन शेंडगे, राजापूर - जि. प. पू. प्राथमिक गोखले कन्याशाळा पदवीधर शिक्षक सुहास काडगे.

या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शैक्षणिक पात्रता, गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, पहिली ते आठवीचे वर्ग असलेल्या शाळेतील शिक्षकांसाठी गुणदान क्रमप्राप्त राहील. जि. प. प्रज्ञाशोध परीक्षा पहिली ते चौथीचे वर्ग असलेल्या शाळेतील शिक्षकांसाठी गुणदान क्रमप्राप्त राहील. शैक्षणिक संशोधन, लेखन व व्याख्यान, नवभारत साक्षरता अभियान/मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानासाठी केलेले प्रयत्न, वृत्तपत्र अथवा प्रतिथयश नियतकालिकात प्रकाशित पाच लेख, नवोदय विद्यालय प्रवेश, शालेय कामांबाबत वरिष्ठांचे अभिप्राय, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, ग्रामीण भागातील सेवाकार्य, मागील पाच वर्षांत वर्गात शाळेत केलेली पटसंख्येतील वाढ असे निकष आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande