पालघर, 4 सप्टेंबर (हिं.स.) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF), पालघर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चिंचणी दत्त मंदिर येथे पार पडणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण, तपासणी तसेच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविणे हा या शिबिराचा उद्देश आहे. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृपेश राजेश बाबरेकर यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, हृदयविकार, श्वसनविकार यासंदर्भातील प्राथमिक तपासणीमहिला व बालकांसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक औषधोपचार सुविधा आयुष्मान कार्ड तयार करण्याची सुविधा निःशुल्क उपलब्ध राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL