रायगड, 4 सप्टेंबर (हिं.स.)। भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड करण्यात आली असून, हे शिक्षक त्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यामुळे सन्मानित होत आहेत.
या बाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी पुढीलप्रमाणे
अलिबाग तालुका – मनोहर पाटील
पेण तालुका – किशोर पाटील
पनवेल तालुका – योगिनी वैदू
कर्जत तालुका – संज्योती कांबरी
खालापूर तालुका – कीर्ती धारणे
उरण तालुका – अजित जोशी
सुधागड तालुका – वृषाली गुरव
रोहा तालुका – प्रसाद साळवी
महाड तालुका – वसंत साळुंखे
श्रीवर्धन तालुका – सीमा चव्हाण व नारायण खोपटकर
म्हसळा तालुका – शशीकांत भिंगारदेव
पोलादपूर तालुका – विजय पवार
माणगाव तालुका – सुजाता मालोरे व परेश अंधेरे
तळा तालुका – उल्का मोडकर
मुरुड तालुका – हेमकांत गोयजी
वेळी या गुणवत्तेची दखल; या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यापनातील नवे उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, आणि समाजात शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
गौरवाचा क्षण असून या पुरस्कारामुळे शिक्षकांचे मनोबल उंचावणार असून, इतर शिक्षकांसाठीही हे एक प्रेरणास्थान ठरणार आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणारा हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sandesh Salunke