अकोला, 6 सप्टेंबर (हिं.स.)।
अकोल्यातील पातूर-अकोला रोडवर गणेश विसर्जनानंतर एक भीषण अपघात झाला. जय बजरंग गणेश उत्सव मंडळाचे सदस्य विसर्जन करून परतत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात चरण अंधारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल, विनोद डांगे आणि विक्की माळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्वजण अकोल्यातील शिवसेना वसाहत गाडगे नगर मधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा मोठा अपघात झाल्याने दुचाकी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे