अकोला, 6 सप्टेंबर (हिं.स.)।
सततच्या पावसामुळे शेती मशागत शक्य नसल्यामुळे सोयाबीन पीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, लष्करी आणि इतर अळ्यांचे प्रमाण वाढले असून, यासंदर्भात अकोला तालुका कृषी विभागाच्या वतीने शास्त्रज्ञासह बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गुरुवार दि.४ सप्टेंबर रोजी पाहणी करून शेतक-यांना मार्गदर्शन केले.
गेल्या 16 ऑगस्ट पासून अतिवृष्टी नंतर जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू असून,पिकांची आंतर मशागत आणि फवारण्या करणे कठीण झाले आहे. अतिपावसामूळे सोयाबीन कापूस पीक पाण्याखाली गेले आहे. विविध अळ्यांच्या प्रादुर्भावासह, बुरशीजन्य रोग, सोयाबीन पिवळे पडणे, यलो मोझाक मुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णता अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत कृषी विभागाची संपूर्ण टीम कामाला लागली असून बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि धीर देण्याचे काम कृषी विभागा कडून करण्यात येत आहे. जिल्हाजय कृष्ण ठोकळ कृषी सल्लागार समिती अध्यक्ष अकोला अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्यासह, अकोल्याचे तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकार, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी डॉ.प्रकाश घाटोळ, डॉ.श्रीकांत ब्राम्हणकर, डॉ.पी.के.राठोड, उपकृषी अधिकारी मनीषा जोशी,सहायक कृषी अधिकारी संजय जाधव, अजय देशमुख यांनी बोरगाव मंजू परिसरातील अनवी, मिर्झापुर, राजापूर, पैलपाडाजय परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत मार्गदर्शन केले. यावेळी संजय वसु प्रशांत नागे केशव धोत्रे पवनकुमार जयस्वाल रमेश सोनटक्के प्रकाश लहाळे गुलाब नागे शंकर वसु सागर राऊत विकास काकड देवानंद नायडेकर सुनील वसु उत्तमराव नवलकर देविदास वसु प्रकाश वसु दिलीप लहाळेजयकू व इतर परिसरातील लोकप्रतिनिधी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे